...

5 views

आतुरता
एक आस तुला भेटण्याची
ध्यास असतो तुझ्या स्वप्नाचा
एक ओढ तुझ्या चाहुलीची
स्पर्श असुदे विश्वासाचा
एक नवी वाट तुझ्या प्रीतीची
सहवास भेटू दे तुझ्या मैत्रीचा
एक खेळ प्रेमात रंगण्याचा
केव्हा येईल तो क्षण तुझ्या आयुष्यात पाऊल ठेवण्याचा

© Snehal