...

6 views

झाडांच्या मनात जाऊ 🌴🌴🌲🌲🌳🌳
झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ
पोपटी स्पंदनसाठी, कोकीळ होऊनी गाऊ....

बहरात वसंतामधल्या, तो सूर सावळा ऐकत
जातील फुलेही रंगून, जन्माला अत्तर घालत
चल सुराबरोबर आपण, तो फाया कानी ठेवू.....

खेळून रंगपंचमी, फुलपाखरे भिजली सारी
हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी
हे भिरभिरणारे तोरण दाराला आणुन लावू...

ही कोणाची रे करणी डोळ्यांत झऱ्याचे पानी