...

6 views

माया गर्लफ्रेंडच्या घरी
आज म्या पहिल्यांदा, माया गर्लफ्रेंडच्या घरी गेलो
तिची माय समजून, बहिणीले काकू म्हणून आलो
काकू म्हणताच रागावून, तिनं पाहिल मायाकडं
मले वाटल साली देते, गालावर तडतड

पण तेवढ्यात आतून, माया गर्लफ्रेंडची माय आली
मले बस म्हणत हातात, दिली पोह्याची थाली
मी खात होतो पोहे, लय भुक्कडवाणी
फुकट होते म्हणून, चांगले दाबले तोंडातूनी

म्या विचारलं "मायी गर्लफ्रेंड हाय कुठं सांगा"
माय म्हणाली "ती गेली मार्केटात मंगा
ती येईल एवढ्यात तुम्ही पसरवा तुमच्या टांगा
काही लागलं तुम्हाले त तुम्ही आम्हालेच सांगा"

थोडया वेळानं रडत रडत, तिचा छोटा भाऊ आला
एवढे भाऊ बहीण पाहून वाटे, काही काम नाही का इच्या बापाला
मी खात होतो पोहे, अन तो रडक्या मायाकडं पाये
मले वाटल आता मागते, हा माये पोहे अन चाय

म्हणून म्या ढुसूढुसू खाल्ले, पोहे पटकनवाणी
चाय पेत पेत घेतली, ढेकर तोंडातूनी
ढेकर होती तोंडातून, पण वाटे निघाली मागुणी
आवाज होता लय बेकार, म्हणून सगळे हसले फुसफुसूनी

तेव्हड्यात माया गर्लफ्रेंडचा, मोठा भाऊ आला
आयिकलं होत कधीकाळी, होता मिल्ट्रीत साला
पण म्या बी होतो, काडीपहिलवान हिम्मतवाला
लढलो असतो पण माया, पॅन्ट होता ढिलाढूला

थोडया वेळानं माया गर्लफ्रेंडचा, बाप तिथ आला
होता कधी पोलिसात, पण आता रिटायर झाला
मले तो विचारे "काम धंदा काय आहे तुला"
म्या सांगितलं त्याले "माया हाय पानठेला"

पानठेला ऐकून त्याची, जरा जास्तच सनकली
मले वाटल माया धंद्यान, आग चांगलीच भडकली
माया बोलण्याने तिच्या बापाची, सटकली सारी
तो मले म्हणे 'तु निघ इथून नाहीत काढतो तलवारी'

म्या म्हटलं "म्या केला का असा गुन्हा
जावई बनवा मले मंग येतो पुन्हा पुन्हा
चांगला हुंडा दया मले मग करतो दुसरा धंदा
तुमची पोरगी सुखात राहीन गाठ आता बांधा"

तुया सारख्या पोट्ट्याले मी, काऊन हुंडा देऊ
त्यापेक्षा मी माया पोरीले, संन्यास घ्यायले लावु
बापाच्या अश्या म्हणण्यान, सटकला माया पारा
वाटे मनात इच्या बापाले, मरावं भुक्क्या तरातरा

तेव्हड्यात तिच्या बापाने, पडकला माया हात
घराबाहेर ढकललं, देऊन कंबरेवर लाथ
तिच्या बापाने केला अपमान, तो सहन नाही होई
दरवाज्या बाहेर पडून मी, फक्त दुःख करत राही

तेवढ्यात मायी गर्लफ्रेंड, मार्केट मधून आली
मले विचारे "तु काय करतोय इथे खाली"
म्या म्हटलं "तुया बापानं मले काढलं घरातूनी
माया केला अपमान आता घेतो बदला युद्धातुनी"

मायी गर्लफ्रेंड म्हणाली,
"अबे माया सोन्या, माया लाडक्या हरि
चुकून घुसला तु, शेजाऱ्याच्या घरी
माय घर ते नाही, हे आहे तरी
म्या घरी बसून विचार करतेय, हा हाय कुठवरी
तु लेका मायी लई, पंचायत केली
वाट बघू बघू मायी, मती भ्रष्ट झाली
आता तरी चल, माया घरी लवकर वाणी
माया घरचे थकलेत, तुयी वाट पाहुनी"

मंग माई गर्लफ्रेंड मले तिच्या खऱ्या घरात नेई
धंदा पानठेला सांगताच तिचा बाप मले डोक्यावर घेई

तिचा बाप म्हणे....
"तुया सारखा जावई मले, आजवर सापडलाच नाई
तुले पाहून कळलं मी, माया पोट्टीले जन्म दिला कश्यापाई
तुया हाय पानठेला, त्याने मी धन्य होई
फुकट खर्रा देजो, तुये उपकार विसरणार नाई
तु माया जावई, मायी मागच्या जन्माची पुण्याई
मी झालो धन्य, आता मले कशाचीच अपेक्षा नाई
मरतो आता सुखात मले कशाचीच अपेक्षा नाई
मरतो आता सुखात मले कशाचीच अपेक्षा नाई ".
© गुरु