...

3 views

शहाणे असून वेड्यासारखे...
संगीताच्या सात सुरांचे वैशिष्ट्य जसे आगळे वेगळे...
तसे माझ्या मैत्रिणींचे गुण ही वेगळे सगळे...

ओबड धोबड मनासारख्या वागणाऱ्या,
इंद्रधनुच्या रंगांसारखे मनाला आमच्या आनंदणाऱ्या...

कोण करेल यांची व्याख्या,
काय लिहू या तर माझ्याच सख्या...

एक आहे कधी ही शांत न‌ बसणारी,
तर दुसरी मुखावर नेहमी हसू ठेवणारी...

एक थोडी अल्लड..
तरी सर्वांना आपलंसं करून घेते हीच तर गल्लत ..

करणाऱ्या आहेत जे मनाला यांच्या भावेल
कधी कधी फारंच खूश होतात या वेड्या
यांचा आनंद गगनात तरी कसा मावेल..

सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या...
आपापसात कुजबुजत थट्टा करणाऱ्या...

कोणी वर्गात बसे शेवटच्या बाकावर,
बसून कधी कधी भांडतात ही राग असे यांच्या...