...

4 views

अमर प्रेम
आठ वर्ष झाली सखे ,तू हे जग सोडून
तु दिलेल्या नकाराची ,ताजी आहे ती खूण

भले अजाण होतो आपण ,त्या शालेय वयात
पण सजाण आहे मी , अजूनही तुझ्या प्रेमात

दर वर्षी ह्याच दिवशी , दुःखी असतो मी
कारण तोडली होती देवानं ,साथ तुझी माझी

पहिल्या प्रेमाची आठवण म्हणून ,रोज रडतो मी
अजूनही ह्या श्रापित मनात ,तुझीच आहे छवि

काहीच क्षण तुझे माझे ,जपले होते काळजात
त्या निर्दयी देवाने केले ,ते क्षणही बरखास्त

माझ्या मनात तुझ्यासाठी ,तशीच आहे जागा
जणू प्रेमाचे प्रतीक ,कृष्ण आणि राधा

जरी आला मनात प्रश्न ,संसार मांडण्याचा
तरी पाहिलं प्रेम म्हणून ,तुझीच असेल जागा

आता ह्या स्वार्थी जगात ,सखे जगत नाहीस तू
पण माझ्या भावनेच्या जगात ,अमर आहेस तू

© All Rights Reserved