...

6 views

पहिली भेट
कॉलेज चा तो पहिला दिवस
आणि तिची ती पहिली भेट,
पहिल्याच दिवशी माझ्यासाठी
ठरली ती कॉलेजची मैत्रीण ग्रेट,

नजर पडताच क्षणी मन झाल
माझे घायाळ जणू तिच्यावर थेट,
कॉलेज चा तो पहिला दिवस
आणि तिची ती पहिलीच भेट,

सगळ काही नवीनच होत खर
तर पहिलाच दिवस कॉलेजचा,
आणि पहिल्याच दिवशी तिच्या
रूपाने दरवाजा उघडला दिलाचा,

साध नाव ही माहित नव्हते मला
आम्ही एका वर्गात असून सुद्धा,
लेक्चर चालू असताना ही मी
हळूच बघायचो तिला अनेकदा,

हळू हळू मन ही तिच्यातच जात
होते पूर्णपणे गुंतत माझे सारे,
एक क्षण ही माझ्या तिच्यावरून
आजिबात हटत नव्हत्या नजरा रे,

आवडायला लागली ती मला जणू
प्रेमच झाले असे मनाला वाटू लागले,
वेड लावत होते तिचे ते अंगी असणारे
संस्कार मनाला एकदम एकत्र सगळे......
© @Swahit kalambate 1044.