...

9 views

दुरावा.....!
पार्श्वभूमी:-
एका प्रेयसी चे तीच्या घरचे वेगळ्याच मुलाशी लग्न जमवतात.. अनं ती ही लग्नाला तयार होते आणि आपल्या प्रियकरास आपलं नातं इथेच थांबवायचा आग्रह धरते... प्रियकर पण तीच्या आनंदासाठी तयार होतो...त्यावेळी त्या प्रियकराची काय मागणी आहे ते ह्या कवितेत........

*******************************************
तुझ्या नावाच एक अक्षर... माझ्या नावाशी गोंधु दे....
तुझ्या दुराव्याचे आसु... तुझ्या कुशीत मुरू दे....
तुला स्वप्नात पहाण्याचा... अगं परवाना राहु दे...
असं सोडुन जाताना... डोळे तुझे ही दाटु दे..

आता एकदाच गं राणी... डोळे भरून पाहू दे...
जरी नाही तुझी साथ...थोडी तुझी आठवण राहु दे...
आपल्या प्रेमाची गं गाणी...मला प्रेमानं गाऊ दे...
असं सोडुन जाताना... डोळे तुझे ही दाटु दे.

अगं नशिबाचे हे भोग...माझे मलाच भोगु दे..
गोड गुलाबी आठवणी..गाठ गठुड्यात गाठु दे...
कधी येता माझी आठवण...डोळे तुझे ही दाटु दे.

(आता ती प्रेयसी तिथुन निघून चालीये आणि तीच्या जाणाऱ्या त्या पाठमोऱ्या देहाकडे पहात प्रियकर देवा कडे तीच्यासाठी काय मागणी मागतो ते.....)

तीच्या वाट्याचे दुःख सारे... माझ्या नशिबी माळू दे....
राजा-राणीचा संसार तीला सुखान थाटु दे...
माझ्या काळजाचा हा तुकडा...देवा सुखान नांदु दे....!
देवा सुखान नांदु दे....!
देवा सुखान नांदु दे....!
-अजित पवार (Aj)

शेर:-
येता तुझी आठवण माझ्या आसवांचा बांध फुटणार आहे....
तु होती....तु आहे....तु असणार आहेस....
डोळ्यातुन निघणाऱ्या प्रत्येक आसवाला तुझ्या नावानेच पुसणार आहे...



© All Rights Reserved