दिवस आपले आठवुन म्हटलं हसून थोडे पहावे...
साठवलेले क्षण राणी वेचत बसतो हल्ली,
आधी तुही होतीस आता मात्र एकट्यानेच त्या क्षणांत रुजावे,
तुला विचारतोय सांग तरी..?
तुझ्या वाचुनी मी कसा नव्याने जगावे.
दिवस आपले आठवून म्हटलं हसून थोडे पहावे...
असे जरी सोबती कल्लोळ तुझ्या आठवांचा,
तुझ्यावाचून एकटेपण कसं गं मी सहावे.
निंदा झाली प्रेमाची तु मी वेगळे होऊनी,
विरहात ढकलुनी आम्हा कधी तुम्हीही भरावे.
दिवस आपले आठवून म्हटलं हसून थोडे पहावे...
केवीलवाण्या डोळ्यात तुझ्या पाहत असे मी तारे,
नयनी तुझ्या हळूच कधी अश्रू पाझरावे.
चाहूल तुझी आजही येते अन मन येते भरुनी,
प्रश्नात पडतो तेव्हाच तेव्हा यातून कसे मी सावरावे.
दिवस आपले आठवून म्हटलं...