...

11 views

प्रेमप्रसंग
या कवितेचा माझ्या वास्तव्याशी काहिही संबंध नाही. हि कवीता एक छोटाचा संदेश देण्यासाठी लिहीली आहे. म्हणुन ह्या कवितेतील पात्र मी माझ्याशी जोडले आहेत..🙏🏻

एक दिवश मी अनं माझा मित्र त्याच्या गल्रफ्रेन्ड ला भेटायला एका सार्वजनिक ठिकाणी गेलो असता त्या दोघांण मधील एक प्रसंग मी ह्या कवितेत मांडण्याचा प्रयत्नं केला आहे.🙏🏻


प्रेमाच्या ऊतुंग महासागरात डुबले होते दोन प्रेम वेडे.
दोघेही विसरे आपल्या आजुबाजूच बसलेत खुप सारे सिंगल रेडे.
ह्या सिंगल रेड्यांच्या अंगात असतात खुप सारे किडे.
आपल्या ताटात काय वाढनार ये, हे सोडुन यांचे दुसऱ्यांच्या ताटाकडेच वाकडे डोळे.
त्या दोघांच प्रेमाच संभाषण रंगात आलं.
मी आपलं झाडांची पाने-फुले मोजण्याचं काम चालु केलं.
तेवढ्यात त्या मुलींच्या फोनचा आवाज आला.
"आहो मी लायब्ररी मध्ये आहे पप्पा" येवढेच बोलुन तो फोन झाला.
मग हळुहळू सोनु, बाबु याचा जप चालु झाला.
ते रंगले होते प्रेमात, अन अंगाला माझ्या काटा आला.
त्यांच ऐकमेकांन मधील अंतर हळुहळू कमी होत होतं.
प्रेमाच्या महासागराला आता पुर येणार हे दिसु लागलं होतं.
तेवढ्यात त्याने त्या मुलीला नजरेने काहीतरी इशारा दिला.
मंग काय दोघांनीही मिटले डोळे, अनं ओठांचा व्यायाम चालु केला.
आत हे अती होत होतं.
आयुष्यात पहिल्यांदा कोणावतरी मन येवढं जळत होतं.
मी दोघांच्या डोळ्यात पाहिलं.
एकाच्याही डोळ्यात शर्मेची एक झलक नाही दिसली.
मी आपलं शर्मेने मान खाली घातली.
म्हंटल मित्रा, तु प्रेमाची व्याख्या आज वेशीवर टांगली.
ऐवढ्या वर्षाच्या आपल्या सोबतीत, आज पहिल्यांदा मला तुझी मित्र म्हणुन लाज वाटली.
तु प्रेम कर, अनं ते केलंच पाहिजे.
पण प्रेमाचे हे सुंदर क्षण चार भिंतीत राहिले पाहिजे.
भविष्यात कधी तरी आपलाही मुलगा किंवा मुलगी प्रेमाची अशीच इज्जत काढतांना दिसु शकते, याच सगळ्यांनी थोड भान ठेवलं पाहिजे.
- अजित पवार(Aj)
© All Rights Reserved