...

9 views

जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पौर्णिमा मँडम...!😘🎂🙏
माझी प्रिय सखी मैत्रिण आणि प्रिय पौर्णिमा ताई ...🙏😘

मला नेहमी तुझ्यात इतरांविषयी खुप आदर ,प्रेम, जिव्हाळा आपुलकी मला दिसते ...
आपली मैत्री सदैव अशीच छान फुलत बहरत राहिल असे मी तुम्हाला आज वचन देते...
आपल्या मैत्री तील तुझ्या सोबतचे सुंदर प्रत्येक क्षण मला
अनमोल क्षणच भासतात ...
तुझ्या मनातील माझ्या साठी चे प्रेम, आपुलकी जिव्हाळा मी तुझ्या नजरेत पाहते...
मनात माझ्या घर करून माझी खास, जिवलग,"निरागस मैत्रिण" म्हणून तु राहतेस...
माझ्या बद्दल तु
नेहमीच खुप सुंदर विचार करतेस...
मला माझ्या भावनांना तु खरंच खुप छान पद्धतीने समजून घेतेस...
मला तू माझ्या बाबतीत खुपच हळवी वाटतेस...
मला वेळोवेळी छान मार्गदर्शन करतेस...
नेहमीच माझ्या आयुष्यातील माझे प्रत्येक आनंद सुख-दुःखाचे क्षण तु माझ्या सोबत वाटून घेतेस...मला मार्गदर्शन करत अशीच माझ्या आयुष्यात सदैव माझ्या सोबत रहा...

तु मला तुझी जिवलग मैत्रिण सखी मानतेस...
तु सुद्धा मला अगदी माझ्या सारखीच एक छान माझे मन समजणारी,
माझी जिवलग सखी ,सुंदर खास ,गोड निरागस मैत्रीणच वाटतेस...
कधी कधी मला तु खुप सुंदर लहान मुलांसारखी निरागस वाटतेस तर कधी खुप खुप समजूतदारपणे वागणारी जबाबदार ,खंबीर स्त्री कर्तृत्ववान स्त्री भासतेस...कधी कधी अल्लड तर,कधी सर्वांशी जुळवून घेणारी...समजूतदार

कधी कधी थोडयावेळे पुरता लटका राग धरून,
रूसणारी आणि पुन्हा थोडा वेळाने सारे काही विसरून स्वतःच बोलणारी परत पहिल्या सारखेच छान बोलणारी
तुझ्या सारखी खास गोड निस्वार्थी निरागस मैत्री निभावणारी
निर्मळ मनाची मैत्रिण भाग्यवंतानाच लाभते.तु मला माझी जिवलग प्रिय सखी मैत्रिण म्हणून मिळालीस म्हणून मी स्वतःला खरंच खुप भाग्यवान समजते...!!🙏🏻🤗😘



"महिला युवा सखी मंच"... च्या अध्यक्षा माननीय" सौ. पौर्णिमा ताई ढवळे " तुम्हाला नंदिनी उर्फ जिज्ञासा तर्फे वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!
तुम्हाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...!🙏🏻💐🎂

तुमची प्रिय लाडकी मैत्रिण
नंदिनी उर्फ जिज्ञासा....✒️✍🏻🙏🏻💐