...

23 views

खारी घोटाळा करी.
आज म्या पहिल्यांदा लायब्ररीत गेलो
भीत लाजत खुर्चीवर बसलो
खुर्ची सरकवली त आवाज झाला
पाये सगळे मायाकड जसा भुतच आला.......

तिथे होती अफाट शांतता
वाटे जसा पसरला सन्नाटा
मी होतो एकटा अन बाकी सगळ्या पोरी
वाटे मी पोहचलो इंद्राच्या दरबारी.........

तिथली प्रत्येक पोरगी मायाकडे पाये
जसा मी राजा अन ते प्रजा हाये
म्या माया दप्तराची चैन उघडली
त प्रत्येक पोरगी शु शु म्हणत सुटली........

मग म्या थोडा जास्तच घाबरलो
वाटे स्वर्ग समजून नरकात आलो
मग पोटान गुडगुड आवाज केला
म्या म्हटलं भूक लागलीय पोटाला........

पोटाले भूक लागली होती भारी
पण दप्तरात होत्या दोन भिस्कीट अन खारी
थोडा आवाज करत खाल्या खारी सारी
पोट्ट्या मायाकड पाय जसे दिमखात मले मारी.....

मन झालं तृप्त खाऊन सगळ्या खारी
वाटे आता झोपावं इथंच...