...

4 views

Mother's day
प्रतिमेला तडा देऊन जातो उनाड वारा
मग जुनाट माळरानावर तडफड होत राहते जीर्ण पाचोळ्याची
आणि मुळावर घाव घातला तरी
वाट पाहत राहतो पुनर्जन्म
त्या तुटलेल्या अवयवात अंकुरित ओलाव्याची
काळाला औषध नसतेच
पाने भराभरा उलटत राहतो तो
बोटे मग उगाच रेंगाळत राहतात
काही पानांमधून...