...

28 views

ती मनातली
@Pranil_Gamre
किती छान होते ते दिवस
शाळेत तुझ्या येण्याची वाट बघायचो
तू आल्यावर मी मनातून अलगद हसायचो

तुला पाहण्यास नजर ही आतूर असायची
तू न दिसल्यास ती ही स्थिर नसायची

सांगायचे होते की प्रेम करतो मी तुला
पण राहून गेले हे सांगणे माझे तुला
कारण वाटलं तुटेल मैत्रीचा हा झुला

मैत्री नव्हे प्रेम हवे होते तुझे मला
स्वतःहून कधीच कळले नाही का तुला

सोबत जरी आपली सुटली होती
मैत्री त्यामुळे कधीच तुटली नव्हती
मन माझं असायचं तुझ्याच ग भवती

समझले जेव्हा तुझे कन्यादान होणार होते
ह्रुदय माझे मला हरलेल्या नजरेने पाहत होते

प्रत्येकक्षणी राग स्वतःच येत होता मला
कारण सांगू शकलो नव्हतो मनातले तुला

हित चिंता सदैव राहील तुझी मला
सुखी वैवाहिक जिवन लाभो ग तुला
#girlfriend #onesidedlove
© Pranil_Gamre