...

13 views

वाट तुझी पाहताना...
वाट तुझी पाहताना ,
भान कशाचे उरत नाही
सरते रात्र तरिही सखे
बांध अश्रूंचा आटत नाही!

हूरहूर दाटते मनी सखे ,
जीव कासावीस होतो
तूझ्या आठवणींतच हल्ली ,
मन रमवण्याचा निष्फळ प्रयत्न करतो!

सागरकिनारी ऊभा राहून ,
गतक्षणांची पाने चाळतो
होता भेट कागदाशी कोऱ्या ,
सखे हमसून हमसून बरसतो!

पूरे झाला विरह सखे ,
ये ना परतूनी माघारी
तू असताना होतो राजा ,
आज तुझ्याविन भिकारी!

एकांतात रमतो हल्ली ,
लेखणीचीच काय ती साथ
तिथे ही तुझेच वर्चस्व सखे ,
आठवणी सोडतात का पाठ?

काळोख दाटलेल्या मनात ,
किरण आशेचा,शिल्लक आहे
येशील परतूनी तू कधीतरी ,
वाट पाहत मी, तिथेच ऊभा आहे...

© बोलक्या भावना