...

17 views

कविता
सांजवेळी त्या एकांतात बसून
​नयनरम्य दृश्य न्याहाळतांना...
​समुद्र किनारा तो हितगुज
​करी मनाशी माझ्या...
​असंख्य भावनांची ती तगमग
​अस्वस्थ करी ​अंतर्मनात तेव्हा...
​हळूच मग संवाद करी तो समुद्र
​हाल हवाल पुसत...
​सुख दुःखाशी एकरूप होत
​जणू जाणवत असावं त्यालाही...
माझ्या ​मनाची अस्वस्थता
​मनाला वास्तवाशी अवगत करत...
​सांगू लागला तो
​बघ माझ्या कडे जरा निरखून...
​इतके उन्हाळे, पावसाळे
​मी मोकळ्या मनाने...
​मोठ्या हृदयाने
​या पोटात माझ्या साठवतो...
​अगणित जीवांचा निवारा
​माझा हा जलाशय...
​नसे गणती कसलीही
​प्रत्येक ऋतूत, प्रत्येक क्षणात,
​प्रत्येक प्रहरी लाटांवर लाटा
​मनसोक्त मी उसळवतो...
​हिशोब ना समजे मला
​तो फक्त तुम्हा माणसातच...
​माझ्या अस्तित्वाचा आलेख
​दरवेळी तुम्हा मानवाला...
​नव्याने जगणं शिकवतो
​पण दुर्दैव माझं...
ते ​आत्मसात नं करता
​आपलाच खोटा...
​आविर्भाव मिरवत स्वार्थी
​आयुष्य व्यतीत करता...
​नि शेवटी या मातीत
​विलीन होता....

​ शोभा मानवटकर...





© All Rights Reserved