...

7 views

विषय :- अभिमान शिर्षक:- आई बापाचे जीवन

अभिमान मला माय-बापाचा,
आदर्श मनी घडविलेल्या संस्कारांचा,
किती घेऊनी संसाराचा अंगावर भार,
आयुष्यात जगताना अडचणी आल्या फार,

कधी येईल जीवनी सुख रे,
नको नको हे आता दुःख रे,
जगावे तर लागतय गरीबीत रे,
कष्ट करुनी देहातून घाम गाळीत रे,

नाही येत पुरेसे वाटेला कधीच पैसे ,
शेतात राब राब राबून जगावे तरी कसे,
माझ्या सुखासाठी स्वतःचे दुःख बाजूला ठेवी,
जणू माझे बाप विठ्ठल, आई रुक्मिणी देवी,

माझ्या शिक्षणासाठी धडपड त्यांची सारी,
जीवनी मोठा व्हावे हीच स्वप्न त्यांची खरी,
कधीच होऊ दिल नाही भार वाईट विचारांचा,
म्हणूनच अभिमान मला त्या आई बापाचा,

सगळं काही मिळवून दिले मला,
जगी कधीच विसरणार नाही नात्याला,
आधार माझ्या संपूर्ण आयुष्याला त्यांचा,
अभिमान आई बापाने केलेल्या कष्टाचा,

कसे मी मांडू आज त्यांचे हे जीवन,
देव म्हणून धरतो मी आज त्यांचे चरण,
सतत मला त्यांचे जीवनी लाभले प्रेमाचे किरण,
अभिमानाने करतो मी नयन मिठूनी त्यांचे स्मरण.....
© @Swa_hitkalambate 1044.