...

11 views

अर्धांगिनी..
तुझ्या एका आवाजाने मन माझं
आनंदून जातं
जाग जेव्हा येते तेव्हा स्वप्न गोड
मोडून जातं

डाव सारा मोडून गेला
धूसर झाल्या आठवणी
कळतील का कधी तुला भावना
माझ्या मनातील

सर्वस्व माझं तुझ्यात मी बघितलं आहे
भेटलीस त्या वाटेवर मी अजूनही उभा आहे
माझं प्रेम आहेस म्हणून
मन दुखावण्या माझं फक्त तुलाच मुभा आहे

आहे जिवंत अजून ही
करण्या तुझा शृंगार मी
आठवण माझ्या प्रेमाची देशील का
अर्धांगिनी होऊन माझी मला पूर्ण करशील का
© AG