...

6 views

देश माझा
प्रजासत्ताक दिनानिमित्त मनःपुर्वक शुभेच्छा.

देश माझा......
संस्कृती,प्रथा,परंपरेचा देश माझा.

शेती,उद्योग,समृद्धीने नटलेला देश माझा.

संत,महापुरुषांच्या विचारधारेचा देश माझा.

अनेक धर्म,अनेक जातीत विखरुनसुध्दा गुण्यागोविंदाने नांदणारा देश माझा.

विविधतेने नटलेल्या भुगोलाला मायेची चादर पांघरणारा देश माझा.

जन-गन-मन म्हणल की स्तब्ध थांबून राष्ट्राची आराधना करणारा देश माझा.

वंदे-मातरम् च्या घोषणेने दुमदुमन जाणारा देश माझा.

स्वतंत्र्याचा ठेवा जपत शहीदांच स्मरण करणारा देश माझा.

शहरात,गांव,खेड्यात,वाडी-वस्त्यात वसणारा देश माझा.

चांदयापासून बांध्यापर्यंत पसरलेला देश माझा.

धोती,लुगड,साडी,पंजाबी,सदरा पासुन जीन्समध्ये नटलेले देश माझा.

शेतकरी,कामगार,व्यापारी,डॉक्टर,वकील,
शिक्षक, विद्यार्थी सर्वाच्या मनात वसलेला देश माझा.

कापुस,धान,काजु,मसाले,आंबा पासुन सफरचंदापर्यंत पिकवणारा देश माझा.

खेळ,साहीत्य,विज्ञान,तंत्रज्ञान,ऊद्योग,शेती क्षेत्रात.

जगात नाव गाजवणारा देश माझा.

सर्व भारतीयांच्या मनामध्ये वसतो देश माझा.
जय हींद ! जय भारत !
कवि-संदीप जाधव पाटील
© आठवनीचा कोंडमारा