...

0 views

बाळूमामाचा महिमा
बाळूमामाची जगभर झाली किर्ती
त्यांच्या दर्शना फिटे भ्रांती
तुमचे चिंतन मनी असे
बाळूमामा तुमच्या नामानी
फक्तं तुमच्या ध्यानानी......

अघटीत महिमा तुमचा अपार
भक्ता फक्त तुमचाच आधार
आदमापुरच्या देवा तुमच्या जपानी
मन तन पार विसावत
संकट जवळ याया धजावत.....

तुमच्या चरणांशी भक्तांची दाटी
प्रसाद मिळे कण्यांची वाटी
कधी कधी काहीच उमगत नाही
भक्त अकांतानी हाका मारी
बाळूमामाच्या अन्न घशाखाली न जायी....

बाळूमामाचा जीव मेंढ्यावरती
अपार माया त्यांच्यावर करती
हातात आलेल्या पिकास
त्यांच्या मेंढ्या खाती
बाळूमामा त्यास दुप्पट देती..

                                   रचना-
                              मनिषा लक्ष्मण मिसाळ ( लोखंडे)