...

5 views

अठराशे च गणित.
अठराशेच्या गणितावर हसले सारे जण..
सांगितलं तीनं खरं..दिसलं नाही का वो तिचं भोळेपण ..
मांडत होती ती गणित वारंवार,
त्या अठराशे वरती चालत असेल तिचं संसार..
कष्टाला तिच्या तीला पैशात मोजता आलं नाही..
हसुन तिच्यावर तुमच्यात माणुसपण उरला नाही..

असेल मोजत ती पैसे बोटा वरती ..
भरत असेल ती पोट त्या अठराशे वरती ..
हसून सगळे तुम्ही उडवली त्याची खिल्ली..
माय -माऊली तिथं ठेवून बघा ना आपली ..
नोटा वरच गणित तिला समजलं नाही..
पण इथं अडाणी कोण हे कळालं नाही..

चुक ना पोरांची ,चुक ना त्या माऊली ची ..
चुक ना त्या पैशांची..चुक होती ती तिच्या निर्मळ मनाची.
सवय हो लागली आपल्याला भोळेपणावर हसण्याची..
पाचशे च्या तीन नोटा तिला कळले नाही..
पण संसार च गणित तिचं मोडल नाही..
पण इथं अडाणी कोण हे कळालं नाही..

©® अशपाक तालीकोटे


© ashpaktalikote