...

5 views

स्वप्न
सांग ना मज तु सख्या
स्वप्नात माझ्या येशील ना
डोळ्यांतील आसवांना
अर्थ नवा देशील ना

येते आठवण तुझी रे सख्या
त्या आठवणींना स्पर्श करशील ना
सांग ना मज तु सख्या रे
स्वप्नात माझ्या येशील ना

नको असा तु दूर जाऊस
देईन न तुला साथ मी आयुष्यभर
मनी नको ठेऊस हा रुसवा
सोड ना आता हा अबोला

किती सांगू मी तुला रे सख्या
मी तुझीच आहे रे
जन्मो जन्मीचे हे आपले नाते
आपल्याला जपायचे आहे रे

सांग ना मज तु सख्या
स्वप्नात माझ्या येशील ना
डोळ्यांतील आसवांना
अर्थ नवा देशील ना

© dhanashri