...

1 views

रंग
पोळल्या फुलाचा गंध मी
रसहीन मकरंद मी !

भर पावसात अवकाशी
रंगहीन सतरंग मी !

कळलो कुणा मी कधी
दुर्बोध एक छंद मी !

विरहात मारव्याच्या
एकटाच दंग मी !

ऊधळुनी रंग सारे
जाहलो बेरंग मी !

दुनियेत वेड्या वेदनांच्या
विव्हळता आक्रंद मी !

भावविश्वाच्या दैवताचा
भंगलेला अभंग मी !
© संदीप देशमुख