...

5 views

मैत्रिण
गोड, गोजिरी, सुंदर, खुळी
कारुण्य डोह काळ्या डोळी,

तरीही कडाडे कडक बिजली
तडफ करारी जगाने पाहिली;

तिला काही सांगण्या जावे
आधीच असते सगळे ठावे,

जराशी अल्लड तरीही गंभीर
साफ़ बोलणे करारा स्वर;

अलिप्त, अजाण, सावध, सुजाण
विश्वासू सदैव मैत्रिण सुजाण...!
- श्रावणी संजय.