कधीतरी.....
कधी तरी तू माझं मन वाचून बघ
कधी तरी नं मागता वेळ मलाही देऊन बघ
कधी तरी भावनांच्या पावसात तू ही चिंब भिजून बघ
तुटलेल्या मनाच्या चटक्यांना तुही जरा सोसून बघ
मागून तर सगळेच काहींना काही देतात
कधी तरी तू न मागताच देऊन बघ
पाहिलंय मी ही तू सोसलेल्या झळांना
पण मीही तुझ्या साठी सोडलेल्या क्षणांना
कधीतरी वळून बघ
तुझ्या मनाचे घाव जाणवतात तुला तसेच
माझ्या अपमानाचे घाव ही उघडून बघ
संकटांच्या आगीत आयुष्य होरपळून गेले
कधी तरी ओसाड जमिनीवर पाऊस होऊन बरसून बघ.
कधी तरी नं मागता वेळ मलाही देऊन बघ
कधी तरी भावनांच्या पावसात तू ही चिंब भिजून बघ
तुटलेल्या मनाच्या चटक्यांना तुही जरा सोसून बघ
मागून तर सगळेच काहींना काही देतात
कधी तरी तू न मागताच देऊन बघ
पाहिलंय मी ही तू सोसलेल्या झळांना
पण मीही तुझ्या साठी सोडलेल्या क्षणांना
कधीतरी वळून बघ
तुझ्या मनाचे घाव जाणवतात तुला तसेच
माझ्या अपमानाचे घाव ही उघडून बघ
संकटांच्या आगीत आयुष्य होरपळून गेले
कधी तरी ओसाड जमिनीवर पाऊस होऊन बरसून बघ.