...

5 views

माझ्या अविस्मरणीय आठवणीतील तू
विसरलो नाही तूला
खूप छान आहेस तू
जगतो आहे तुझ्या आठवणीत
तुला स्मरून बघताना

कधी आठवण काढू शकलो नाही
तर स्वार्थी समजु नकोस
आयुष्य गुंतलय माझ
तुझ्या सुखांच्या शोधात

तुझ्या सुखांच्या सरीत
मी बघत आहे तुला
माझ्या नादावलेल्या डोळ्यांनी
शोधत आहे तुला

मृत्यूंजयासारखा अस्वस्थ पडलोय
आठवूणी तुझ्या सहवासातला मी
करता आरोळ्या कानाशी
ऐकू येतात फक्त तुझ्याच गुजगोष्टी

कळत नकळत हे कसे घडले
माझे प्रेम तुझ्यावर जडले........






~विकास खरात~