कोकणातल्या निसर्गसारखीच तेथील माणस
नैसर्गिक सौंदर्याने नटलेला कोकण प्रांत,
कोकणातील माणसांचा स्वभाव एकदम शांत...
कोकणामधील उंच उंच डोंगर रांगा,
संधी देऊन सेवा करायला त्यांना सांगा...!
कोकणातल्या रस्त्यांची नागमोडी वळणे,
कोकणी माणूस सेवा करेल नेहमीच आपुलकीने...!!
कोकणातले खळखळ वाहती झरे,
कोकणी माणसांचे प्रेमळ मन किती पहारे...!
पक्षी करती आकाशी किलबिलाट,
कोकणी माणसांच्या स्वभावाने पडाल प्रेमात अफाट..!!
कोकणातला हापूस आंबा आहे कोकण भूमि ची शान,
कोकणी माणूस पाहुण्यांचे पाहुणचार करण्यात आहे महान..!
कोकणात आहे गोड फळांचा रानमेवा,
कोकणी माणसाचे एकच उद्दिष्ट माणुसकीने माणूस जपावा..!!
कोकणभूमी आहे अनेक रत्नांची खान,
प्रत्येकाला आनंदी ठेवतात कोकणी माणूस जीवाला जीव देऊन...!
अभिमान मला त्या कोकणी मातीचा,
गर्व आहे मला कोकणी ह्या माणुसकीच्या जातीचा........ !!
कवी :- स्वहित दिपक कळंबटे...
© @Swa_hitkalambate 1044.