Religion (f) or existence
मला परत एकदा ठरवू दे ,
धर्म आणि वृत्ती म्हणजे काय
मला परत एकदा वाचू दे ,
माणूस कोण आणि पशुता म्हणजे काय !!
बघ त्या कापडी फडफडण्याला मला एक एक रंग देऊ दे
विभागू दे निसर्गाला धर्माच्या नावाखाली!!
तो तुझा आणि हा माझा असे म्हणून ह्या चैतन्य शक्तीला शिक्कामोर्तब करू दे
मग मी खऱ्या अर्थी अनुयायी होईल!!
मी आयुष्य भर करत राहीन या धर्माचे अनुकरण नामस्मरणा सारखे!!
आणि हळूहळू प्रवचनात देत राहील न कळलेले अध्यात्म!!
बघ उतरवलंय न मी गळी
तुमच्या ,मला अभिप्रेत असलेला धर्म!! आता तुमचा उध्दार होईल!! मोक्ष मिळेल!
आणि मी मोकाट पुन्हा माणुसकीवर
चर्चा करायला
तुमच्यातला सनातन
धर्म जागा करायला!!
कशाला ? गाठू मी सम्यक अष्टांग मार्ग डोळे मिटून स्वत्व शोधत!
मी शेंदूर फासून दगडच ठेवतो बोधीवृक्षाखाली आणि उंच झेंडा रोवतो
मगच खर्या अर्थाने धर्म स्थापन होईल ,पालन ही होईल
तुम्हालाही खरा धर्म कळेल !!!
© Bkt...