...

1 views

आंतरजळणारा अंतर्मन!
स्वप्न येतात बहरून मन होते अशांत जेव्हा,
अस्तव्यस्त होऊन जाते सर्वे मस्तकी तुझेच विचार येतात तेव्हा |
आहे काही तरी असे जे अतुर आहे बाहेर येण्यात,
पण वाटते असे की काही गोष्टींमुळे ते दडून बसले अंतर्मनात |

आता बस एकच माझी आशा,
विश्वास ठेवलाय तुझवर नको देऊस मला निराशा |

जोवर भेटत नाही तुला,
शांती भेटणार नाही ह्या जीवाला |

सर्व माहीत असूनही अज्ञान बनतोस तू ,
मनातले दडपण सांगायला तुला कसं सामोरं जाऊ |

रडू येईल मलाच तू दुर्लक्ष करू नकोस,
तुझा चरणी आले राया आता मला कुठे जाऊ देऊ नकोस |

© pritz