...

2 views

दुसरे तारूण्य ...
दुसरे तारूण्य ...



हि धुंद जागराची...

कि मुक्त पाखराची ...

तारुण्य सारून झाली...

चाहुल मुक्त वावराची...



हे विचार प्रगल्भतेचे...

कि वागणे प्रौढतेचे...

नखशिखांत अनुभवांची...

यादीच जणु ल्याली...



झेलून संकटे छाती...

अति पहाड झाली...

विचार फिरता मागे...

नयने दाटून आली...



सुटले ते हातचे ना...

उरले ते भाग्य होई...

मानुन सुख सागराचे

पाणीही गोड होई...


© SURYAKANT_R.J.