...

4 views

महाराष्ट्राची खाकी वर्दी

महाराष्ट्राच्या शूरवीरांनो सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद वाक्य तुमचे आहे रे भारी,
जगातली गुन्हेगारीच नव्हे तर समाजावरील
संकट दूर करण्याची जबाबदारी घेता सारी ||1||

कसले असले आयुष्य आहे तुमचे
ना कधी जाता येत वेळेवर तुम्हाला घरी,
सकाळ असू किंवा रात्र प्रत्येक दिवशी
सेवेस हजर असता जणू माणुसकीतला पहारेकरी ||2||

आलेली वाटेला नुसती ड्युटी करुनी साधे छोटेसे ही साजरे करता येत नाही सण,
महाराष्ट्राचे शूरवीरांनो खाकी वर्दीच्या देवदूतांनो कसे जगावे लागते मारून मन ||3||

ड्युटी वरती असताना वेळेवर नाहीरे मिळत तुम्हाला कधीच अन्न आणि पाणी,
मायभूमी महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी सेवेस रुजूनी धावपळ करत असता प्रत्येक क्षणोक्षणी ||4||

रूप डोळ्यासमोर घेऊनी मांडावेसे वाटले कविरुपात आज, तुमच्या खाकी वर्दीच्या यशोगाथेला,
साक्षात पंढरीचा विटेवरी असे, हाकेला धावता शूरवीरांनो माझा मानाचा मुजरा तुमच्या पोलीस खात्याला ||5||


कवी ✍🏻:- स्वहित दिपक कळंबटे
(स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य)
© @Swa_hitkalambate 1044.