...

17 views

माझं स्वातंत्र्य.
आज झालं वय एकवीस खरं
म्हणुन गेलो दादा कड
म्हटलं मले लग्न करायच हाय
तू मुलगी आजच पाय....

दादानं हाणली एक गालात
म्हणे "आधी माय मग तुयी वरात
लेका मी मायासाठी पोट्टी पाहून ठेवली
अन तू तुयी मधातच घुसवली".....

असं कस हे माझं स्वातंत्र्य !!

मग गेलो वडिलाकड
म्हटलं वय माय झालय बर
पाऊ पोरगी अन उरकवू माय
म्हणजे एक वर्षात पाळणा हल-तोय .....

वडिलांनि दिली एक थूतकारीत
म्हणे आधी अभ्यास मग लागू तयारीत
नशीबच माय फुटक निघालं
लग्नाची इच्छा मनातच राहाल....

असं कस हे माझं स्वातंत्र्य !!

मग गेलो आईकड
म्हटलं तू एवढं काम करते हे बर न्हव
तुझ्यासाठी एक सून आणायचीच
वेळ बहुतेक आता माझीच झाली.....

आई आता थोडीशी हसली
हातात झाडू घेऊन मायाजवळ बसली
म्या पळालो लागलो तुरु तुरु
अन आईन झोडपल मले धरू धरू.......

कस कस हे माझं स्वातंत्र्य. !!

आता आला मले भयानक राग
सगळे होते एकच खोलीत अन एकच आवारात
सगळ्याकड म्या पहात होतो
म्या त्यांले म्हटलं इनकलाब झिंदाबाद अन भारत छोडो...

माया सोबत आता अजबच घडलं
म्या म्हटलं भारत छोडो म्हणुन मलेच घराबाहेर काडल
घराबाहेर होतो म्या दोन दिवस
लयी होता तरास, नव्हत आता सरत.....

काही दिवसांन घरासमोर
राहिले आली एक पोट्टी
मस्त होती दिसत जशी
पहीली प्रेमाची चिट्ठी.....

म्या तिले वय विचारलं
तर आहे म्हणे ती सतरा
म्या म्हटलं पुढल्या वर्षी होते तुले अठरा
मग करू आपण घरासमोर लग्नाचा खतरा खतरा खतरा.


© गुरु