...

0 views

लाडाची लेक
प्रकार : काव्यबत्तिशी

लाडाची लेक

सासरी निघाली ग..
लाडाची ही लेक ग माझी
शिदोरी सोबती ग..
संस्काराची डोई साजी..

मेहंदी रंगली ग..
हाताची बोटे झाली लाल
खारट पाणी पडे
भिजली मायेची ती शाल

संसार रचला ग..
लेकीचा या माझ्या छान..
दृष्ट काढली होती
लाजली काया गोरी पान

माहेरी पाहुणी ग..
झाली ती ग माझी सावली
संस्काराचा ग साज..
गर्विला उर ग माऊली..

सुखाची चाहूल ग..
आजीची झाली वेडी माया
सहीली ती वेदना..
झाली माया लेकीची छाया

काही चुकलं का ग..
आईचं मन शोधताना
कसली ममता ती..
मायेचे गीत ते गाताना..

काळजाचा तुकडा..
दिला ग परक्याचे हाती
कशी सावरु बाई..
आईची ओंजळ ती रिती

* कृपा *
© krupasiddhesh