...

1 views

क्रांतिज्योती
निपजुनी कन्यारत्न नायगावी
होऊनी गृहशोभा नेवशे पाटलांची
वाढली खंडोजीच्या अन् लक्ष्मीबाईंच्या संगोपनात
सावी म्हणून आल्या ओळखण्यात


माप ओलांडून आल्या
फुलेकुळी नांदीले बंध जोतीशी
झाल्या सूनबाई त्या फुल्यांची
अन् सावित्री त्या जोतिरावांची


घडविल्या गेल्या थोर शिल्पकार हाती
जसे जोतिरावांना पत्नी लाभल्या
उदंड ममतेने न्हाऊन निधाल्या
कौतुकाने प्रोक्त झाल्या

कुणी शेन उधळल..
तर कुणी खरकट पाणी.
न जुमानले कशास..
मुक्त केली स्त्रीची वाणी

दगडधोंड्याचा मारा
सहन केला त्या माईने..
रक्त वाहिले देहवरून
तरी न कुणास जुमाने

सहन शक्तीचा झाला अंत
हात तिने उदगारला भिऊन गेले पंत
रागाने लालबुंद झाली
शिक्षणाची जगदंबा अवतरली

श्वेत वस्त्र धारण केले
अबोध संयम दर्शविले
अजान होते वय
स्त्री शिक्षण होते ध्येय

होत्या त्या जोतीरावांच्या सहचारिणी
कधी सल्लागार तर कधी झाल्या आई मायेपोटी
चक्र होऊनी स्त्रीशिक्षणाच्या रथाचे
समानतेच्या सद् भावानेचे प्रतिबिंब साचे..

कोणास वाटे होत्या त्या स्त्रिशिक्षिका
कोणास वाटे जैसे मुख्यद्यापिका
भाग्य या रयतेचा देशाचं,
लाभली ऐसी नखंशिखा

झाले त्यांचे अनेक निवाडे
कधी स्वकीयांनी तर कधी परकीयांनी
कर्तव्यपाई सोडले पाणी नात्यांवर
वाटे याचा शिक्षणासही गौरव

मूर्ती होती क्रांतिज्योती पदाची
पत्नी होती ती जोतिरावांची
दिले मायेचे आश्रय अनेकांसी
प्रकाशुन उठल्या होऊनी प्रेरणामूर्ती

स्त्रियांस झाल्या अवकाळी
काळ सर्वत्र विखुरला
निरव अंधकार मनास पडला
दुःखाच्या विघ्नहरता अवतरल्या
तेव्हा सरस्वती जगदंबा प्रतिबिंबल्या

शिक्षणकार्याला समाजाचा वेढा
सावित्रिजोतीनी वेडीला
पराक्रमाचा मोडा शत्रूंना दिला
चकवा शिवरायांचा गनिमीकावा साधला

कित्येक वर्षे स्त्री होती कैदेत व्यथीत
राखले चे स्त्रियांना अबाधित
निष्ठेचे अंकुर गगनचुंबीले
माय माऊली सावित्रीमाई म्हणून संबोधले

गाठली त्यांनी मशालीची परिसीमा
वंदितो तया चरणी
न भुता नः भविष्यती
स्त्रीशिक्षणाच्या यशोमती

वृत्ती कणखर होती
त्यांची कृती असीम होती
त्यागाची धनी होती
पुष्कळ सावित्री शोभे
जैसे महाराष्ट्राची क्रांतिज्योती

Written by दर्शन बोंबटकार