...

39 views

कल्पनेला माझ्या मी शब्दात मांडते...
मी माझी नसून
पूर्णपणे अक्षरांची होते...

डोक्यातील विचारांना
शब्दात उतरवते...

डोळ्यातील अश्रूंना
वाट करून देते...

देवावरील निर्मळ
भाव दर्शविते...

वेळेला सुंदर
क्षणात रेखाटते...

निसर्गातील सौंदर्याला
नजरेने खुणावते...

मनातील माझ्या
वेदनांना लपवते...

रक्ताच्या नात्याला
अलगद टिपते...

मैत्रीच्या साथीला
सोबत घेते...

निस्वार्थी प्रेमाला
स्पर्श करते...

हृदयातील भावनांना
हळुवार जपते...

अंत:करणातील
आठवणींना उजाळा देते...

कविता माझी खुप
काही सांगते...

मनातील कल्पनेला
कागदावर टिपते...

{पूनम}🖊️