...

13 views

संस्कृती चा पदर तो आता राहीला नाही.
संस्कृती चा पदर.. तो आता राहीला नाही.

उघड़ी पडली नाती , उघड़े पडले संसार
अंगावरती कपडे बदलुन संस्कृती जपता आली नाही.
जात्यावरली अंगाई आता ऐकु येत नाहीं.
वेश बदलाले सारे अन्
डोक्यावरती पदर दिसला नाही.
संस्कृती चा पदर.. तो आता राहीला नाही.


शहराच्या धुंदीत प्रकाश उजाळले
पण दारावरती लावलेला दिवा दिसत नाही.
मोठे झाल्या इमारती.. संबंध झाली छोटी
शंभर वर्षे टिकणारे वाडे आता उभारतही नाही.
संस्कृती चा पदर.. तो आता राहीला नाही

जिस्न पेंट घालुनी आजही माय मीरवते.
लोरी सोडुन बाळाला मोबाईल वर गाणं ती ऐकवते.
हट्टाने ते ओढणार पदर आता हातात येत नाही.
संस्कृती चा पदर.. तो आता राहीला नाही.


ब्रेन्डेड ब्रेन्डेड करुन साधेपणा उरला नाही.
नशेच्या धुंदीत जमीनी पुरल्या नाही.
पैशाच्या रंगांमध्ये आज माणुस उरला नाही.
वाटुन बंध नात्याचे आज घराला घरपण वाटत नाही.
संस्कृती चा पदर.. तो आता राहीला नाही.


© ashpaktalikote