उल्लेख इतिहासाच्या रूपखुणेचा....
पुन्हा भगवा झेंडा फडकवूया स्वराज्याचा
पुन्हा उमटवुया इतिहास आपण शिवरायांचा
वाटते मनाला हम्मी आता ह्या गडकोटांचे
जपणूक करूया सह्याद्रीच्या अस्तिस्त्वाचे
हो मी जन्म घेतलाय ह्या महाराष्ट्राच्या भूवरी
गडकोटांची वाट म्हणजेच आमची पंढरी खरी
उन्हाळा असू किंवा पावसाळा नाही फरक कसला
तरी पाऊल टाकू सह्याद्रीत आहे भटक्या असला
ऐतिहासिक गोष्टी आहेत रे साऱ्या मोठ्या तेथे
गडकोटांवरती पाऊले उमटलेत शिवरायांचे जेथे
दगडाचा देव असू किंवा दगडांची मंदिरे सारी
आमच्यासाठी मानाचे श्रद्धास्थान आहेत ती खरी
जीवनी भटकंती करतो आम्ही गडकोटांवरी
आवड आहे आम्हा मन रुतले त्या जागेवरी
उभ केले होते स्वराज्य आपल्या राजांनी
म्हणून रयत जगत होती एकदम सुखांनी
असा दैवत आपल्या अखंड महाराष्ट्राला लाभला
आरे सह्याद्रीतच काय साऱ्या दुनियेत गाजला
कायम मनात ठेवतो आम्ही त्यांना कुळ देवाच्या रूपाने
जीवनी जगताना वाटेवर नेहमी चालतो शिवरायांच्या विचाराने
जय शिवराय......
कवी. स्वहित दिपक कळंबटे
(स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य)po
© @Swahit kalambate 1044.