...

22 views

कधीतरी वाटतं... *'' पुन्हा मातीत खेळावं ..!!!*
कधीतरी वाटतं...
*'' पुन्हा मातीत खेळावं ..!!!*

ओलेचिंब होऊन
रिमझिम पावसात नाचावं !
ये रे ये रे पावसा म्हणतं
गाणं हसत खेळत गावं .!!

कुडकुडत्या थंडीमध्ये चार
पांघरूणं घेऊन झोपावं!
सकाळच्या आळस झोपेत
स्वप्न गोड गोड पाहावं !!

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये
सुर-पारंब्या खेळावं!
आजीबाईच्या गोष्टींमध्ये
थकून झोपी जावं !!

.................. 😌😴
© Gautam