...

2 views

आली होळी आली
मासा मधी माघी
आली होळी आली
मोद रंगे न्हाली
सानुली तन्हुली !!

मोही मन मोदे
रंगाशी संवादे
वितुष्ट संपु दे
पुरण आस्वादे !!
©®@Devideep3612
होलिका पूजन
करिती स्वजन
नित्य करण्यासी
दुष्ट निर्दालन !!

मग रंग रंग
खेळू सारे जण
मिटवू वितुष्ट
मिळून आपण
©®@Devideep3612
आली होळी आली
रंगात नहाली
प्रेम रंग आले
समस्तांच्या गाली !!

रंग व गुलाल
खेळूया आपण
निसर्गाशी सख्य
ठेऊ सारे जण !!
©®@Devideep3612