...

5 views

दादा मला वहिनी हवी...
दादा मला वहिनी हवी
जरा तु मनावर घेणा,
मला ताईसारखी ती
समजून घेईल ना,

वहिनी लाडकी माझी
प्रेमाने करेल लाड माझे,
मला बघून तिला ही
आठवतील भाऊ तिझे,

आई बाबांसारखीच
जपेल अगदीच मला,
हक्काने दादा बघ मी
वहिनी बोलेन तिला,

कधी आली अडचण
तर ती समजून घेईल,
वहिनी म्हणून मला
नक्कीच मार्ग देईल,

दादा मला वहिनी हवी
तु जरा मनावर घेणा,
ह्या आपुलकीच्या घरी
तिला आनंदात ठेवु ना,

वहिनीचा स्वभाव असेल
गोड माणुसकीतला खरा,
तुमचा संसार ही चालेल
बघ दादा सुखाने बरा,

आई बाबांच्या सेवेला रे
हवी आता खरंच लेक घरी,
दादा मला वहिनी हवी
तु तिला घेऊन ये सुखाने दारी,

एकमेकांना समजून घेवु
वहिनीला ही आपलस करू,
वहिनी असली तरी तिला
घरची लेक म्हणून स्वीकारू,

दादा आणशील ना वहिनी
तु हा माझा आहे मोठा हट्ट,
तिच्या येणाने बघ घरातल
नात ही होईल प्रेमाने घट्ट,

वहिनी लाडकी ती माझी
प्रेमळ असेल खरी मायेची,
नेहमी ठेवेल घरावर आधार
ती बघ आपुकीच्या छायेची.....

*✍️:- स्वहित दिपक कळंबटे.*