...

4 views

*आई*
आई म्हणजे अफाट मायेचा सागर
सातजन्मीही न फिटणारे असे तिचे उधार,
आई म्हणजे निखळ उत्तुंग आकाश,
जसा असे सुर्यकिरणाचा प्रकाश।

डोंगर दऱ्यावर चरी गाय,
परी चित्त नाही तिच्या ठाय,
मनी आठव येई वासराची,
माय धाव घेई गोठ्याची।

राणीवणी हिंडत असे शोधत ही दाना,
पाहता तान्ह्या हत्तीला सुटत असे हत्तणीचा पाणा।
शिस्त लावण्या बछडयानां जन्म रेषेत देई,
सिहिंन शिकार करणयासाठी वनात त्यांना नेई।

मांजरी आपल्या पिल्लांना तोंडामध्ये धरी,
सात ठिकाणे बदलुनी पिल्लांचे रक्षण सदा करी,
अंड्यातील पिल्लं पाहण्या कासव धाव घेई भुईवरी,
बाहेर येताच पिल्लांसोबत समुद्राची सफारी ती करी ।

स्वतः भुकी राहून पिल्ला खाऊ देई श्वान मादा,
वेळ येता बाळासाठी लढण्या दक्ष ही सर्वदा,
पिल्लास घेऊन कुशीत उन्हातान्हात ही फिरे,
पाहुनी निस्वार्थी प्रेम अस्वलिचे मन मात्र गहिवरे।

पक्षी असो वा प्राण्यांची आई
मुलांकरिता धडपड तिची होतच राही,
मुलांसाठी काबाड कष्ट करत असे ही माऊली,
डोक्यावर शोषून रखरखते उन्ह बाळाला मात्र देई सावली।


देव ही रडले होते जन्मदाते करिता,
अवतार रूप धारण करुनी पूर्ण केली ती कमतरता।
जशी असते वटवृक्षाची चहूकडे छाया,
तशीच असते आईच्या हृदयात प्रत्येक मुलासाठी माया।

आईची ममता विसरणं
म्हणजे शरीरातून प्राण सोडणं,
दारोदारी कड्याकपड्यात देव शोधण
म्हणजे जन्मदाते देवीला विसरणं।

देवाला जाता येत नाही प्रत्तेक स्थानी
भक्तासाठी देवाने आपली प्रतिकृती बनविली आई म्हणुनी,
म्हणून सांगतो साऱ्यांना आई वडील सोडुनी दुसरे दैवत नाही,
चुकवू शकेन ऋण तयांचे एव्हढी माझी ऐपत नाही।

----- *तुषार नेरुरकर*

© All Rights Reserved