...

6 views

कुठेतरी...
आताशा एक आवाज उठलाय कुठेतरी
आणि कोणी तरी शांत झालाय कुठेतरी

आहे काही असे कि जस हे सगळं काही
ह्याच्या अगोदर ण घडून गेलंय कुठेतरी

तुला झालंय तरी काय कि साऱ्या वस्तूंना
ठेवलंयस कुठेतरी अन शोधतोय कुठेतरी

जो पहिल्यांदा कुठेच कधी जात नव्हता
आज खूप दूर दूर निघून गेलाय कुठेतरी

आज काही स्मशानाचा वास येतोय येथे
कुठले का कुणाचं मढ जळतंय कुठेतरी

तू मला शोधत राहा अन मी शोधतो तुला
दोघांतला कुणी आज हरवलाय कुठेतरी

किती भीती आहे ह्या गर्दीत माणसांच्या
ज्याला हि पाहावं तो घाबरलाय कुठेतरी

मी तर ह्या शहरात आता कुठेच नाही
काय माझं नाव हि लिहिलंय कुठेतरी