...

7 views

आनंदी जीवनाची वाट चुकवली रे, ह्या रोगाने

काय आयुष्यात आज ही वेळ आली
जगभरात पसरला हा रोग कोरोना,
जगण्याची वाट संपत चाली आता
तरी मागार हा रोग का घेईना,

कुटुंबात ही सगळे नेहमी आनंदात होते
ह्या पृथ्वीवरती येण्या आधी हा रोग कोरोना,
काय करावे तरी काय नक्की जगी असा प्रश्न पडलाय आता
जीवनाच्या वाटेवर आले आहे हे नवीन रोगरूपी मोठे संकटना,

ह्या प्रसंगी सगळे मार्गच बंद झाले
नाही जाता येत कोणाकडेच आता,
नाही नातीगोती जवळ सोबत ह्या वेळी आपल्या
ह्या कोरोनाच्या रोगामुळे नाही येत कुणालाच भेटता,

नेहमी सारखे जीवन जगत होते सारे
रोजच्या ठरलेल्या वेळेवर कामावरती जात होते सगळे रे,
ही अशी वेळ आली जीवनाच्या वाटेला रे
घरीच बसावे लागते आता कारण कामच झाली सारी बंद रे,

आयुष्यात जगण्यासाठी सुंदर मोकळी हवा घ्यावी लागत होतीरे
आता ह्या कोरोनाच्या रोगामुळे तोंडाला लावायला लागतो जगण्यासाठी मास रे,
कसे जगावे गरिबांनी आयुष्यात आता रे
इथे करायला कामच नाही तर खायचे झालेत सगळे वांदे रे,

ह्या रोगाच्या भीतीने घाबरली सारी जनताना
कसा लढा द्यावा ह्या रोगाला आता तेच काही समजेना,
पहिले वाटायचं सगळे सोबत असतील तरच असेल आपल्यात एकीपणा
आता मात्र एकत्र संपर्कात आल्यानेच वाढतोय जास्त हा रोगना,

हे देवा गणराया मनापासून तुझ्या चरणी विनंती करतो आज तूला
हे आलेले तुझ्या भक्तांवरती संकट लवकरात लवकर दूर करना,
पुन्हा तुझ्या नामात तळींन व्हायचे आहे ह्या तुझ्या सगळ्या भक्तांना
सुखी ठेवरे नेहमी सारखे सगळ्यांना हा रोग कायमचा करून नष्टना,

पुन्हा आतुरतेने वाट बघायची आहे तुझ्या आगमनाची आम्हाला,
पुन्हा एकत्र यायचं आहे गणराया तुझ्या ह्या आनंदी सणाला.......

कवी :- पै. स्वहित दिपक कळंबटे...
( आपलेच स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य )
© @Swa_hitkalambate 1044.