...

11 views

कलेचा आदर
आठवण येत नाही तुझी
कारण दगड झालोय मनाने
फरक नाही पडणार तुझ्या
कोणत्याही कपटी सल्ल्याने

आभास झाला होता मला
की चुकीचं काही तरी घडेल
अपेक्षा नव्हती की ते विकृत शब्द
तुझ्या तोंडून ऐकेन

भरीव डोळ्यांनी तिरकस बघून
आशा खूप दाखवलीस
दोन डोंगराच्या शर्यतीत
तिसरीकडे मान वळवलीस

सौंदर्याचा फायदा करून
कोणी नाही घेत
ध्येय निश्चित असणारे
कधी करत नाही भेद

करावा अहंकार रूपाचा
पण मर्यादा ठेवावी त्याची
उच्च शिखर गाठलंय त्यांनी
जे कदर करतात कलेची

नशीबवान आहे मी
जो नाही ठेवला विश्वास तुझ्यावर
कपटी अपघात टाळला
जो होणार होता मनावर

अपमान करते त्यांचा
ज्यांनी दिलीये जीवनाची चालना
गोड झोप लागावी तूला
म्हणून हलवलायांचे सारखा पाळणा