...

26 views

सुंदरी
आई सोबत आज म्या ब्युटीपार्लर मध्ये गेलो
तितचे सगळे भूत पाहून मी तात्काळ पळालो
काही होते तिथ डोळयांवर काकडी लावून
तर काही होते भाज्याचा लेप माऊन

मले वाटल म्या आलोय भाजी मंडीत
होते सगळे थोबाडीत लावून टमाटर न भेंडी
मले थोडं आता समजलं कावून वाढली महागाई
कारण सगळं भाजीच येते ब्युटीपार्लर च्याच ठाई

म्या ते सगळं पाहून जास्तच घाबरलो
म्हणून लगेच ब्युटीपार्लर च्या बाहेर आलो
बाहेर येताच घेतला थोडा मोकळा श्वास
अंदर चे थोबाड पाहून होत होते भूतांचे भास

ब्युटीपार्लर च्या बाहेर होता एक पाणीपुरीवाला
बनवल्या दोन प्लेट अन खाल्ल्या भेल साऱ्या
म्या भेल खात असताना तिथं आल्या दोन पोरी ...