❤️माय-बाप❤️
🙏🏻एका मुलाला लहानाच मोठं करायला त्याच्या माय-बापानी घेतलेले कष्ट तो लग्न झाल्यावर आपल्या बायकोला सांगत आहे आणि तीच्या कडुन त्याला आपल्या माय-बापासाठी काय अपेक्षा आहे हे ह्या कवितेत मांडले आहे..🙏🏻
माय माही बनुन दिव्यांची वात, तीनं केलं आयुष्य माझं लखाट..
बाप महा बनुन पायाची वहान, दीला मला ताट मानेनं जगायचा मान..
माय फुक मारुन अन्नांचा घास, मला भरवी प्रेमानं तो घास..
बाप हातात घेउनं हात, मला शिकवी चालाया वाट..
मायेचा माह्या दिस दिस सरे, सरता घरातल काम...
बाप महा शेतात राब राब राबत, वहात घामाचे गं पाट...
माय मला निजवी प्रेमानं, डोहिवर फिरवुन मायेचा हात..
बाप घेउनं मला कुशित, सांग राजा-राणीची गं बात..
मला कराया लहानाचा मोठं, त्यानीं केलाया रातीचा दिस...
त्यांचं उभ आयुष्य सरो सुकात, देवा येवढीच माही तुह्याकड विश...
एकच गोष्ट माह्या राणी तु ठेव तुह्या ध्यानी मनी..
माय-बापाची गं जागा माह्या काळजात, राणी तुह्या गं आधी..
लक्ष्मींच्या पावलांनी नवी पाहुनी घरा आली..
घराला फुटतील का गं फाटे, हुरहुर मनी झाली..
अगं माह्या राणी, तुह्या जवळ येवढीच मागणी..
माय-बापा माह्या राणी, जप तु जशी आपली सावली.
माय-बाप माह्यासाठी माहे विठ्ठल-रखुमाई...
-अजित पवार (Aj)
© All Rights Reserved