...

6 views

कधी कळलेच नाही...


कधी कळलेच नाही तुझे प्रेम
तासंतास बोलणारा तू जेव्हा
टाळायला लागलास..
माझ्या काळजीने कासावीस होणारा तू
कुठे हरवलास..
आपुलकिने विचारपुस करणारा तू
सापडतचं नाहीस रे कित्ती शोधलं तरी..
कुठे तरी विरून गेलाय तुझा सहवास
तुझ्या शब्दांसारखाचं...
बोलण तर होतंच राहत रे आता ही
पण त्यात ती आस जाणवतंच नाही..
तू ही इथेच आहेस ,मी ही इथेच आहे
पण " आपण" कुठे तरी हरवलोय रे..
वेड्यासारखं प्रेम करणारा तू
कधी दुरावलास कधी कळलंच नाही रे
कधी कळलचं नाही...

© बोलक्या भावना