...

12 views

पुन्हा एकदा..!
हसणे विसरलो होतो, रडण्याची सवय झाली होती. पण आयुष्याच्या या वळणावर सगळं उलट घडताना पाहतोय मी.
पुन्हा एकदा स्वतःच्या प्रेमात पडतोय मी..!

नशिबाला दोष देत, परिस्थितीशी झगडत, कसतरी जगत होतो. फक्त नैराश्य होतं आयुष्यात एकदा आशेचा किरण खुलताना पाहतोय मी.
पुन्हा एकदा स्वतःच्या प्रेमात पडतोय मी..!

आता मात्र मी आनंदी असतो, कधीही हसतो, स्वतःशीच बोलत बसतो. काहीही मनाला लावून न घेता जगण्याचा आनंद घ्यायला शिकतोय मी.
पुन्हा एकदा स्वतःच्या प्रेमात पडतोय मी..!


अविनाश..!