...

2 views

ओसाड झालं गं अंगण...
इतकी वर्षे या बागेत तुला वाढविले,
छोट्याशा रोपाला झाड बनवून आभाळ दाखविले,
अंगणाला होती रिंगण घालत,
आईच्या मायेने हसत
बाबांच्या प्रेमात खेळत,
होतं बालपण तिने फुलवलं
तिच्या कवेत अख्खे जग होतं वसवलं,
तिला कोठे ठाऊक होतं,
एक दिवस सर्व सोडून जावे लागेल,
बाबांच्या खांद्यावर बसून मिरवणारी राजकुमारी हरवणार होती,
काम सोडून मनमोकळेपणाने बसणारी मुलगी,
जबाबदाऱ्या होती पेलणार
येणार ते समोर झेलणार
आईची लाडकी पोर आज आईचे पदर सोडणार
सगळा विचार करून काळजाला धस्स होतो,

वडिलांना कधी रडताना पाहिलंय का हो?
ते रडतात तुमच्याहून ही जास्त रडतात,
मात्र कधीच दाखवत नसतात,
आपल्या मुलीला पोरक्या घरी पाठवताना,
त्यालाही वाईट वाटते
त्याचेही कंठ दाटते,
त्याच्याही डोळ्यात अश्रू साठते,
जो‌ बाप आपल्या राजकुमारी साठी रोज नवीन कपडे आणायचा,
आज तो‌च तिच्यासाठी लग्नाचा बस्ता तयार करतोय,
त्याला होता येईना व्यक्त,
चेहरा त्याने करुन घेतलाय सक्त,
जिचे तो हौस पुरवायचा,
रडायची तेव्हा तिला अलगत उचलायचा,
तिच्या चिमुकल्या‌ पावलांनी चालताना तिला बोटाचा आधार द्यायचा,
त्याच पावलांनी आज ती माहेर ओलांडत आहे,

आईची दशा रडून रडून कोमेजलेल्या फुलांसारखी झाली,
तिला ही आठवतीये‌‌ तिची लहानपणीची जिद्द,
आई.. आई.. मला पण करु दे ना गं चपाती,
आज पोर सासर ची वाट धरती,
आजारी पडली तेव्हा आईच्या कुशीत निजली,
पाऊसात अंगणात नाचत भिजली,
मी नसेल तिथे तेव्हा कोण तिची काळजी घेईल?
आईच्या हृदयात हेच काहूर माजले,
नऊ महिने पोटात तिला वाढवलं,
कडेवर घेऊन तिला जग दाखवलं,
आई-बाबांनी तिच्या पंखांना बळ दिलं,
आज हे अंगण ओसाड झालं,

लहान बहिणीची वेडी माया,
आज तिची सावली तिला सोडून चालली,
तिची भावना ही अबोली,
कळेना तिला झालंय,
दीदी खरंच दुसऱ्या घरी जाईल हे तिला स्वप्नंच वाटे,
कोण मला आधार देईल,
प्रेमाने सांभाळ करेल,
समजून‌ मला कोण घेईल,
वाहते अश्रू माझे कोण पुसेल,
भाऊ कोपऱ्याला जाऊन रडत असतो,
तो‌ विचार करून करून पडत असतो,
सोपं नसतो हो‌ मुलीचं माहेर चं चौकट ओलांडणं!

-Vanshika Chaubey































© All Rights Reserved