...

1 views

आयुष्याच्या वाटेवरती
  आयुष्याच्या  या वाटेवरती
येतच होत्या संकटाच्या भरती...

जगण्याचे गणित चुकले सारे
बसले होते अपयशाचे मोजत तारे.....

डोळे मिटून विचार रंगून गेले,
सगळेच आयुष्य गंजून गेले....

क्षणभर मनात विचार आला,
तेवढ्यात दुःख टपली मारून गेला.....

तरीही मनाला सावरत होते,
अन् ,दुःखालाही आवरत होते...

जगणेच कसे विसरुन गेले,
तारुण्यातच कसे मरुन गेले....

झाले होते आपलेच फरार,
आपलेच करतात आपल्याशी करार....

आता नको हे असले जगणे,
सोपेच वाटते आता मरणे....

नको झाली आता कहाणी दुःखाची
एक तर पायरी असावी  सुखाची....

              आयुष्याच्या वाटेवरती
           मनिषा मिसाळ (लोखंडे)