...

20 views

हे विश्व प्रेमीकांचे
असता समीप दोघे हे ओठ मूक व्हावे
शब्दांवीना परंतु बोलून सर्व जाई।

अतृप्त मीलनाचे,विरहातही सुखाचे
विश्वाहून निराळे, हे विश्व प्रेमीकांचे।

फसवा वरून राग, रुसव्यात गाढ प्रीती
होता क्षणिक दुर वेडी मनात भीती।

दिनरात चिंतनाचे ,अनिवार कौतुकाचे
विश्वाहुनी निराळे, हे विश्व प्रेमीकांचे।
💞 कविता 💞